मिरज, ५ जून (वार्ता.) – येथील सनातनचा साधक कु. शिवम महेश कावरे याने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. कु. शिवम हा येथील सनातनचे साधक श्री. महेश कावरे यांचा मुलगा आहे. शहरातील एम्.इ.एस्. इंग्लिश शाळेत तो शिक्षण घेत आहे.
कु. शिवम याचा शाळेत दुसरा क्रमांक आला आहे, तसेच त्याला ‘संस्कृत’ या विषयात १०० पैकी ९४ गुण, तर गणितामध्ये १०० पैकी ९५ गुण मिळाले आहेत. या यशाविषयी कु. शिवम म्हणाला की, एम्.इ.एस्. इंग्लिश शाळेतील मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, तसेच सर्व शिक्षक यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे मला हे यश प्राप्त झाले आहे. मी प्रतिदिन अभ्यास करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करत होतो, तसेच पटलावर अष्टदेवतांची चित्रे समोर ठेवून मी अभ्यास करत होतो. मी नियमितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना अणि कृतज्ञता व्यक्त करत होतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे हे यश प्राप्त झाले असून यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.