कु. आर्य नाईक यास १२ वीत ९१.६७, तर कुमारी संजना कुलकर्णी हिला ९०.३३ टक्के

१२ वीच्या परीक्षेमध्ये पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. आर्य प्रवीण नाईक

पुणे – येथील कोथरूड केंद्रातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला युवा साधक कु. आर्य प्रवीण नाईक याला १२ वी ‘सायन्स बोर्डा’च्या परीक्षेत ९१.६७ टक्के आणि ‘जेईई मेन्स’ परीक्षेत ९७ ‘परसेंटाईल’ प्राप्त झाले आहेत. ‘परीक्षेत मिळालेले यश गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मिळाले आहे’, असा त्याचा भाव आहे.

कु. आर्य हा सनातनचे साधक श्री. प्रवीण नाईक आणि सौ. रश्मी नाईक यांचा मुलगा आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे.

चि. आर्य याने त्याच्या यशाविषयी बोलतांना सांगितले की, मी नियोजनपूर्वक अभ्यास करण्यावर भर दिला. त्यामुळे परीक्षेचा कोणताही ताण आला नाही. गुरुदेवांनीच हे नियोजन करून घेतले. त्यामुळे अभ्यासासमवेत सेवाही (‘स्क्रीन शेअरिंग’ची) करता येत होती. नामजप, गणपति स्तोत्र हेही नियमित केले. अभ्यास रात्री जागून न करता सकाळी लवकर उठून करायचो, त्यामुळे आपोआप प्रार्थना, आत्मनिवेदन, आवरण काढून अभ्यास चालू होत असे. ज्या पटलावर मी अभ्यास करत होतो, त्यावरच गुरुदेवांची दर्शन पुस्तिका समोरच ठेवलेली असायची. त्यामुळे गुरुदेव सतत समवेत आहेत, हा भाव ठेवला जायचा. शिकवणीवर्गाच्या परीक्षेनंतरही आपण कुठे अल्प पडत आहोत ? याविषयी चिंतन केले जायचे. त्यामुळे कोणत्याही परीक्षेत अल्प गुण आले, तरी निराशा येत नसे किंवा अधिक गुण मिळाले तरी हुरळून जात नसे. परीक्षेला जातांना उपाय, प्रार्थना करून जात असे.

कु. संजना कुलकर्णी

पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सनातनची साधिका कु. संजना कुलकर्णी हिने इयत्ता बारावीच्या ‘एच्.एस्.सी.’च्या बोर्ड परीक्षेत ९०.३३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. कोथरूड केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. प्रीती कुलकर्णी आणि श्री. संकेत कुलकर्णी यांची संजना ही कन्या असून तिने पुणे येथील ‘फर्ग्युसन कॉलेज’मध्ये शिक्षण घेतले आहे.

कुमारी संजनाविषयी बोलतांना तिची आई सौ. प्रीती कुलकर्णी यांनी सांगितले की, तिला लहानपणापासून साधनेची आवड आहे. तिची गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) अपार श्रद्धा आहे. अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीला प्रार्थना करणे, आवरण काढणे या कृती ती नियमित करत असे. ती ‘स्क्रीन शेअरिंग’ची सेवा पण करत होती. अभ्यास करतांना कधी गुरुदेव, तर कधी श्रीकृष्ण समोर बसले आहेत, असा भाव ती ठेवायची.