मुंबई – न्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या असून ५ जणांना महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या (डी.आर्.आय.च्या) अधिकार्यांनी अटक केली आहे. त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या अवैध आयातींवर पाळत ठेवली होती.
संबंधित ४० फूट कंटेनर संमतीसाठी ‘अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन’मध्ये उतरवला जाणार असल्याची माहिती मिळाली होती; परंतु तो एका खासगी गोदामामध्ये नेण्यात आला. या कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणार्या अधिकार्यांना हे संशयास्पद वाटल्याने आणि त्यांनी कंटेनर गोदामात अडवला. संपूर्ण कंटेनरमध्ये एस्से, मॉन्ड, डनहिल आणि गुडंग गरम या विदेशी आस्थापनांच्या सिगारेट होत्या. या सिगारेटच्या आयातीवर भारतात बंदी आहे. या खासगी गोदामात सिगारेट काढून त्यात कागदपत्रानुसार असणार्या वस्तू भरण्यात येणार होत्या.
मुंबई के न्हावा शेवा पोर्ट से भारी मात्रा में 24 करोड़ की विदेशी सिगरेट जब्त, 5 गिरफ्तार #CigarettesSeized | #Mumbai https://t.co/Td9Ay98zSh
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) May 14, 2023
या कारवाईत एकूण १ कोटी २० लाख सिगारेट जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत २४ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. गेल्या २ मासांत ३० कोटी रुपयांच्या सिगारेट न्हावा शेवा बंदरातून पकडण्यात आल्या होत्या; पण त्यानंतरही या तस्करीत घट झालेली नाही. दुबईतून मोठ्या प्रमाणात सिगारेटची भारतात तस्करी केली जाते.
नवी मुंबई न्हावा शेवा पोर्ट, मुंबई DRI को मिली खुफिया जानकारी के आधार पर, मुंबई ने न्हावा शेवा पोर्ट (जवाहरलाल नेहरू बंदरगाह) पर प्रतिबंधित सामग्री ले जाने के संदेह में एक कंटेनर की पहचान की. साथ ही जांच के दौरान पता चला की इस कंटेनर में करीब 24 करोड़ रुपये कीमत की प्रतिबंधित… pic.twitter.com/W0L1eBO2gX
— Khabar India News (@khabarindianew) May 14, 2023