दैनिक ‘सनातन प्रभात’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात एका व्रतस्थाप्रमाणे कार्य करणारे एकमेवाद्वितीय दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एखाद्या व्रतस्थाप्रमाणे कार्यरत असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदुद्वेष्टे आणि निधर्मीवादी यांच्याकडून करण्यात येणार्‍या टिकेवरील खंडण, धर्मावर होणार्‍या आघातांची वृत्ते, साधकांना साधनेत उपयुक्त आणि मार्गदर्शक अशा अनुभूती प्रसिद्ध केली जातात. या विविध सदरांविषयी आणि दैनिकाविषयी  सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान अन् त्या अनुषंगाने त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) उपकरणाद्वारे घेतलेल्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

कु. मधुरा भोसले
सौ. मधुरा कर्वे

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणारी रंगांची वलये आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

दैनिक ‘सनातन प्रभात’ पाहिल्यावर त्यातून लाल, गुलाबी, केशरी, निळ्या, पिवळ्या आणि पांढर्‍या रंगांची वलये वातावरणात प्रक्षेपित होतांना दिसतात. विविध रंगांच्या वलयांचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

टीप – विविध देवतांच्या जत्रोत्सवाच्या विशेषांकामध्ये भाविकांनी दिलेले विज्ञापनांचे लिखाण आणि त्यांची मांडणी (संरचना) इतकी सात्त्विक अन् कलात्मक असते, की त्यातून चांगली स्पंदने येऊन वाचकांचा भाव जागृत होतो. ‘विज्ञापने पाहूनही भाव जागृत होणे’,अशी अनुभूती केवळ दैनिक सनातन-प्रभातच्या संदर्भातच्या संदर्भात येते.

 २. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणार्‍या घटकांचे प्रमाण आणि त्यामुळे साधक अन् वाचक यांना होणारे विविध प्रकारचे लाभ  

 ३. दैनिक ‘सनातन प्रभात’चे आगमन घरामध्ये झाल्यामुळे विविध पातळींवर सूक्ष्म स्तरावर होणारे लाभ

अशा प्रकारे दैनिक ‘सनातन प्रभात’ विविध तेजांनी युक्त असल्यामुळे ते स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही दृष्टीने परिपूर्ण आहे.

४. कृतज्ञता

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रूपाने श्रीगुरूंच्या अनमोल विचारधनाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन जणू त्यांचा दिव्य सत्संगच मिळतो. आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रूपाने श्रीगुरूंच्या तेजस्वी विचारांच्या रूपात मौलिक मार्गदर्शन मिळते. यासाठी आम्ही श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहोत.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२३)

५. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून येणे

आजच्या स्पर्धात्मक युगात समाजातील बहुतांश दैनिके निव्वळ व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन कार्यरत आहेत. त्या दैनिकांशी संबंधित काम करणारे कर्मचारी केवळ उदरभरणासाठी तेथे चाकरी करतात. याउलट दैनिक ‘सनातन प्रभात’चा उद्देश ‘राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती’ हा आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणारे सर्वजण साधक आहेत. ते दैनिकाशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांची साधना म्हणून करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभीपासूनच साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्यास शिकवले. थोडक्यात दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सर्व घटक सात्त्विक आहेत; त्यामुळे दैनिकातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक स्पंदनांमुळे वाचकांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो.

६. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानाच्या भोवती ‘।। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।।’ या नामजपाचे मंडल घातल्याने झालेला परिणाम

८.१०.२०२० या दिवसापासून दैनिकातील पानांच्या भोवती ‘।। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।।’ या नामजपाचे मंडल घालणे आरंभ केले. ‘दैनिकाच्या पानाच्या भोवती देवतेच्या नामजपाचे मंडल घातल्याने काय परिणाम होतो ?’, हे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आले. यातून लक्षात आले की, मंडल घातल्याने दैनिकातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दुपटीहून अधिक वाढली; म्हणजे दैनिकाची सात्त्विकता पुष्कळ वाढली.

७. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या विविध विषयांवरील लेखांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

या लेखांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा आहे आणि तिचे प्रमाण निरनिराळे आहे. या संशोधनातून दैनिक ‘सनातन प्रभात’चे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित होते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.३.२०२३) 

‘सनातन प्रभात’ मध्ये रज-तम प्रधान बातम्या छापाव्या लागल्या, तरी त्यांतून सात्त्विकता प्रक्षेपित होण्याचे कारण म्हणजे त्याचा सात्त्विक उद्देश आणि त्या संदर्भात सेवा करणारे साधक

‘सनातन प्रभात’ नियतकालिक असल्यामुळे त्यात प्रतिदिन घडणार्‍या रज-तम प्रधान बातम्या छापाव्या लागतात. असे असले, तरी त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होते, हे उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांमुळे सिद्ध झाले आहे. या सात्त्विकतेचे कारण म्हणजे नियतकालिकाचा उद्देश सत्त्वप्रधान समाजाची आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा आहे आणि नियतकालिकात सेवा करणारे सर्वजण साधक आहेत. ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेमुळे वाचकांना आणि साधकांना त्याच्या अनुभूतीही येतात.

‘सनातन प्रभात’मध्ये सात्त्विकता असल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असलेले अनेक साधक आध्यात्मिक स्तरावर चैतन्य मिळण्यासाठी त्याचा वापर करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.