दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे मला स्वतःच्या स्वभावात पालट करण्यात पुष्कळ साहाय्य झाले !

दैनिक ‘सनातन प्रभात’

‘गेल्या ३ वर्षांपासून मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत आहे. दैनिकाचे वाचन केल्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो. कधी दैनिक घरी पोचायला उशीर झाला, तर माझ्या मनाला सारखी हुरहुर लागते. मी दैनिकातील गुरुजींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) लिखाण वाचते. नोकरीला जात असल्याने वेळेच्या अभावी माझ्याकडून दैनिकातील बातम्यांची शीर्षके वाचली जातात. मी जेव्हा घरी असते, तेव्हा दैनिकाचे पूर्ण वाचन करते. मी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या चौकटींचे पालन करते आणि त्यानुसार कृती करते. कधी बरे वाटत नसेल, तर मी दैनिक उशीखाली ठेवून झोपते. दैनिक वाचून झाल्यावर अधूनमधून मी ते समाजातील लोकांना वाचायला देते. माझा स्वभाव चिडचिडा आहे. दैनिकाच्या वाचनामुळे मला स्वतःच्या स्वभावात पालट करण्यात पुष्कळ साहाय्य मिळाले. ’

–  सौ. प्रीताली योगेश पेडणेकर, खोर्ली, म्हापसा, गोवा