‘मंदिरांच्या ऐवजी रुग्णालये उभारा’, असे म्हणणे हे धर्मभावना दुखावणारे !

‘आजकाल जो तो उठतो आणि प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत किंवा सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करत आहेत, ‘भारताला मंदिरे नाही, तर केवळ रुग्णालयाची आवश्यकता आहे.’ काही अंशी ते खरेही मानले, तरी मानवतेच्या दृष्टीकोनापेक्षाही मंदिर आणि त्यापेक्षाही हिंदु धर्म यांविषयीचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन यांतून व्यक्त होतो.

‘शिकले-सवरलेपणा’ चा रोग !

‘मी वनांचल जनजाती समाजात कार्य करत आहे. आजही जनजाती समाजातील सर्व सनातन विचारधारेशी जोडलेले आहेत. त्यांच्यामध्ये भक्ती आणि निरागसता आहे; परंतु सर्वांत मोठे दुर्भाग्य आहे की, जे उच्च विद्याविभूषित झाले आहेत त्यांना ‘शिकले-सवरलेपणा’ हा एक रोग झालेला आहे.’

विद्यार्थ्यांना मगध, चोला, चेरा, पांड्येन आणि हिंदवी स्वराज्य या साम्राज्यांविषयी शिकवा !

केंद्रशासनाने देशातील सर्वच हिंदु राष्ट्रपुरुषांचा प्रेरणादायी इतिहास राष्ट्रीय स्तरावर शिकवून विद्यार्थ्यांमध्ये शौर्यजागृती करावी !

‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी नास्तिकतावाद्यांच्या हत्यांमागील बाहेर न आलेले सत्य उघड करणारे पुस्तक !

हे पुस्तक म्हणजे नास्तिकतावादी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांसंबंधी प्रकाशित माहिती अन् न्यायालयाचा आदेश यांविषयी एक विस्तृत संशोधन आहे. या पुस्तकातून वरील हत्यांच्या अन्वेषणातील  अनेक अज्ञात तथ्ये उघड केली आहेत.

जात : राष्ट्रीय एकात्मता आणि हित यांमध्ये बाधक !

‘जात नष्ट करणे’, हे सर्व महान नेत्यांचे स्वप्न होते; परंतु सद्यःस्थितीत जातीची अस्मिता वाढवण्याचे चुकीचे काम चालू आहे. राज्यघटनेनुसार जातीची कोणतीही परिभाषा (व्याख्या) नाही.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धोरण म्हणजे ब्राह्मणविरोध !

ख्रिस्त्यांकडून केल्या जाणार्‍या ब्राह्मणविरोधाचे मूळ जाणून सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक !

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ? पूर्वीच्या काळी तर उपजीविकेसाठी सरकारी चाकरी नव्हती.

उन्हाळ्यातील थकव्यावर सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘उन्हाळ्याच्या दिवसांत प्रतिदिन दिवसातून २ वेळा ‘सनातन शतावरी चूर्ण वटी’ या औषधाच्या २ – २ गोळ्या, तसेच १ – १ चहाचा चमचा ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’ थोड्याशा पाण्यासह घ्यावे. याने उन्हाळ्यात येणारा थकवा न्यून होण्यास साहाय्य होते.’

सनातनच्या ‘भावी संकटकाळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून सनातनची ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका वाचा ! 

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !