जनहो, उत्पादनांवर छापलेली देवतांची चित्रे किंवा शुभचिन्हे यांची विटंबना होऊ नये, यासाठी ते इतरत्र न टाकता त्यांचे अग्नीविसर्जन करा ! 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘सध्या अनेक उत्पादक स्वत:च्या उत्पादनांवर जनतेच्या श्रद्धास्थानी असलेल्या देवतेचे नाव, चित्र किंवा शुभचिन्हे छापतात. उत्पादनांवर देवतेचे नाव श्रद्धापूर्वक छापलेले असले, तरी त्यांचा वापर झाल्यावर बर्‍याचदा देवतेचे नाव पायदळी तुडवले गेल्याने अथवा कचरापेटीत टाकल्याने त्या देवतेची विटंबना होते.

देवतांच्या चित्रात, तसेच नामामध्ये त्यांची शक्ती कार्यरत असते. आपल्या देवतांची, श्रद्धास्थानांची अशा प्रकारे विटंबना होऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा वस्तूंचा वापर झाल्यावर त्या वस्तूवरील देवतेच्या नावाचा ‘स्टिकर’ अथवा चित्र अग्नीत विसर्जन करावे. त्या वेळी संबंधित देवतेला ‘माझ्या हातून तुझा अपमान होऊ नये, यासाठी तुझे चित्र अग्नीत विसर्जित करत आहे’, अशी प्रार्थना करावी. ज्या वेळी एखाद्या वस्तूचे अग्नीविसर्जन करणे शक्य नसेल, तेव्हा देवतांच्या नावाची अथवा चित्राची विटंबना होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२३)