ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धोरण म्हणजे ब्राह्मणविरोध !

१. हिंदु समाजाचे धर्मांतर करण्यासाठी सर्वप्रथम फ्रान्सिस झेवियरकडून ब्राह्मणविरोधाला प्रारंभ

‘आज भारतात ब्राह्मणविरोध ही अधिकृत विचारसरणी बनली आहे. त्यात सत्ताधारी हिंदुत्वनिष्ठही अविचारीपणे त्यांची नोंद करत आहेत. जेव्हा इतिहासाविषयी अनभिज्ञ लोक धोरणात्मक निर्णय घेतात, तेव्हा परिस्थितीची भयावहता समजून घेतली पाहिजे. हिंदु धर्माचे उघड शत्रू असलेल्या परकीय ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ब्राह्मणांवर टीका करणे चालू केले होते, याची आपण स्वतःच निश्चिती करू शकतो. त्यांच्यापूर्वी सर्व देशी-विदेशी लेखक, विद्वान इत्यादींनी ब्राह्मण आणि हिंदु समाज यांचे गुणगानच केले आहे. प्रारंभी असे आक्रमण फ्रान्सिस झेवियरने (१६ वे शतक) चालू केले. तो म्हणाला, ‘‘समाजावर ब्राह्मणांचा प्रभाव असतो. त्यामुळे हिंदूंना ख्रिस्ती बनवण्यासाठी तो प्रभाव संपवणे आवश्यक आहे.’’ हाच ब्राह्मणविरोधाचा सिद्धांत-व्यवहाराचा प्रारंभ आणि शेवट आहे की, जो आजही आपण पडताळू शकतो. प्रत्येक ब्राह्मणविरोधी हा हिंदु धर्म वा समाजाला तोडणे आणि लढवणे यांचे समर्थन करणारा किंवा त्याविषयी बेफिकीर असलेला आढळून येईल. अर्थात् ब्राह्मणविरोध हा मुळात आणि शेवटी हिंदु समाजाला नष्ट करण्याच्या धोरणाचा भाग आहे. त्यासाठी धूर्तपणा आणि बळ यांचाही वापर करण्यात आला आहे. त्याचाही प्रारंभ फ्रान्सिस झेवियरनेच केला होता. जरी पोर्तुगीज वसाहती शासकांनी त्याला इतके सैन्य दिले नाही, तरीही झेवियरने गोव्यामध्ये भयावह प्रमाणात अत्याचार केले. हिंदु मंदिरे पाडल्यानंतर झालेल्या आनंदाचे वर्णन त्याने स्वतः केले आहे. त्याचे पहिले लक्ष्य ब्राह्मण होते. त्यामुळेच हिंदु राजे युद्धानंतर पोर्तुगिजांशी केलेल्या करारात ‘ते ब्राह्मणांना मारणार नाहीत’, असे लिहून घेत असत.

प्रा. शंकर शरण

२. बहुतेक नेते आणि विचारवंत यांच्यावर ब्राह्मणद्वेषी अपप्रचाराचा प्रभाव

मिशनर्‍यांचे अधिक प्राणघातक आक्रमण वैचारिक होते. त्यांच्या दुष्परिणामांना आज मोठे पीक येत आहे. सततच्या अपप्रचारामुळे शिक्षणातही अशा विषारी गोष्टी घुसडण्यात आल्या आहेत, ज्याचा हिंदु समाजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आज बहुतेक नेते आणि विचारवंत ब्राह्मणद्वेषी गोष्टींना खरे समजतात. जरी प्रारंभी या गोष्टी ख्रिस्ती मिशनरींच्या साहित्याखेरीज कुठेही आढळत नाहीत. श्रेष्ठ-कनिष्ठ, विशेष मान इत्यादी मानवी भावना किंवा कमतरता, तर मानवजातीमध्ये सर्वत्र आहेत; मात्र भारतात याला विकृत स्वरूप देऊन ‘ब्राह्मणवाद’ उभा करण्यात आला आहे.

३. हिंदूंमध्ये अग्रणी असलेल्या ब्राह्मणांचा नायनाट करण्याचे मिशनर्‍यांचे धोरण

डॉ. कूनराड एल्स्ट यांच्या मते ‘जगाच्या इतिहासात यहुदी विरोधाखेरीज ब्राह्मणविरोध ही ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालू केलेली सर्वांत मोठी प्रचार मोहीम आहे.’’ खरे तर मिशनर्‍यांना आधी ब्राह्मणांचे धर्मांतर करायचे होते, जेणेकरून सामान्य हिंदूंना ख्रिस्ती बनवणे सोपे जाईल. चीन, जपान आणि कोरिया या देशांमध्ये त्यांची ही रणनीती काही प्रमाणात यशस्वीही झाली होती. समाजातील अग्रगण्य लोकांना ख्रिस्ती बनवून अन्य लोकांना मोहित करणे, असा त्यांचा डाव होता; पण जेव्हा त्यांना यात यश मिळाले नाही, तेव्हा ते शत्रू झाले. ब्राह्मणांचा नायनाट करण्याचे धोरण आखण्यात आले. केवळ याच्या पद्धती वेगळ्या होत्या. इटलीतील ख्रिस्ती मिशनरी रॉबर्ट नोबिली याला हिंसाचारापेक्षा फसवणूक अधिक आवडायची. तो ब्राह्मण वेशात स्वतःला ‘रोमन ब्राह्मण’ म्हणवून घ्यायचा आणि ‘येशुर्वेदा’ला ५ वा वेद म्हणायचा, जो भारतात ‘हरवला’; पण रोममध्ये सुरक्षित आहे’, असे म्हणायचा.

४. उच्च वर्णियांचे समर्थक राहिलेल्या चर्चने १५० वर्षांपूर्वीपासून ‘शोषित-पीडितांचे समर्थक’ म्हणवून घेणे

अर्थात् प्रारंभी मिशनर्‍यांचे उच्च वर्णाप्रमाणे धोरण होते. सेंट पॉलने तर गुलामगिरी प्रथेचे सक्रीय समर्थन केले होते. पोप ग्रिगोरी (१६-१७ वे शतक) याने भारतात चर्चला जातीभेद ठेवण्यास सांगितले होते. चर्चने १८-१९ व्या शतकापर्यंत समानतेच्या कल्पनेला जोरदार विरोध केला होता. ते विशिष्ट वर्णीय आणि वंशपरंपरागत सत्ता यांच्या बाजूने होते. ही तर गेल्या १५० वर्षांची गोष्ट आहे, जेव्हा जगात समानतेचे वारे वाहू लागले, तेव्हा चर्चने रंग पालटून स्वतःला ‘शोषित-पीडितांचे समर्थक’ म्हणवून घेणे चालू केले. त्यामुळे भारतात १५० वर्षांपूर्वीपर्यंत मिशनर्‍यांमध्ये खालच्या जातीतील लोकांविषयी चिंता असल्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीत, ज्याचा ते दावा करतात. आजही गोव्यातील अनेक चर्चना उच्च आणि खालच्या जातींच्या लोकांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे आहेत ! असा प्रकार कोणत्याही हिंदु मंदिरात कधीही नव्हता.

५. हिंदु धर्माला तोडण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून दलितांचा वापर

मिशनरी संस्था त्यांच्या शैक्षणिक-बौद्धिक कार्यांमध्ये तोपर्यंत दलितवादी आहेत, जोपर्यंत त्यांचा हिंदु धर्म-समाज तोडण्यासाठी उपयोग होतो. ते डॉ. आंबेडकरांचाही मोडतोड करून वापर करतात. ते आर्य-अनार्य सिद्धांत, बौद्ध धर्माचा विद्ध्वंस, हिंदु-मुसलमान विरोध इत्यादींविषयी डॉ. आंबेडकरांच्या गोष्टी लपवतात. त्यामुळे सेंट थॉमस किंवा झेवियर हे भारतात ‘समानतेचा’ संदेश घेऊन आले नव्हते. त्यांनी हिंसाचार, फसवणूक आणि कटकारस्थान यांच्याद्वारे भारतात हातपाय पसरले. यात आज दलित तसेही प्यादे आहेत, जसे पूर्वी त्यांनी पूर्वी ब्राह्मणांना बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात अपयश आल्याने त्यांचा ब्राह्मणद्वेष पराकोटीला पोचला !

६. जातीव्यवस्थेमुळे इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या आक्रमणांपासून हिंदूंचे रक्षण

केवळ खोट्या अपप्रचारामुळेच आज आपण जातींविषयी नकारात्मक गोष्टीच ऐकत असतो. जणू जात, म्हणजे केवळ द्वेष आणि दडपशाहीच आहे. जातींमध्येही सुरक्षितता, सहकार्य आणि कुटुंब-भावना आहे, ज्यावर पडदा टाकण्यात येतो. जेव्हा की, यावर येथील सर्व जातींनिष्ठांना अभिमान वाटत आला आहे. याची साक्ष भारतात करण्यात आलेल्या ब्रिटीश सर्वेक्षणांच्या कागदपत्रांमध्येही मिळते. सर्व जातींना स्वतःचा अभिमान होता. त्यांच्यात हिनतेचा भाव नगण्य होता, ज्याचा अतीरंजित प्रचार केला जातो. किंबहुना जातींमुळेही इस्लाम आणि ख्रिस्ती यांची आक्रमणे सहन करून हिंदू टिकू शकले. आपली स्थिती आफ्रिका किंवा पश्चिम आशिया यांसारखी नाही, ज्यांच्या संस्कृती इस्लामने काही वर्षांतच समूळ नष्ट केल्या.

७. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ब्राह्मणांचा ‘अत्याचारी’ असा अपप्रचार

गेल्या १०० वर्षांपासून मिशनर्‍यांचे मुख्य लक्ष्य खालच्या जातीतील आणि वनवासी लोक राहिले आहेत. ते ब्राह्मणांना ‘अत्याचारी’ आणि मिशनरींना ‘संरक्षक’ संबोधून प्रचार करतात. शिक्षणामध्ये ब्राह्मणद्वेष भरणे, ही हिंदु विध्वंसाची एक पायरी आहे. मिशनरी शाळांमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृती यांचे विकृत धडे शिकवले जातात.

सततच्या अपप्रचारामुळे निरागस विद्यार्थी अनेक खोट्या गोष्टी आत्मसात करतात. त्यांना हेही ठाऊक नाही की, येथे प्रत्येक जातीचे लोक महान शिक्षक, कवी, ज्ञानी आणि संत होत आले आहेत. खरे तर ब्राह्मणांनीच धर्मांतरित मुसलमान आणि ख्रिस्ती यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचेही काम केले आहे. मिशनर्‍यांच्या रोषाचे हेही एक कारण होते. फ्रेंच लेखक अब्बे द्युब्वा आणि रेव्हरंड नॉमन मॅक्लियॉड याने ब्राह्मणांना शिवीगाळ केली होती. द्युब्वा याने ब्राह्मणांचे वर्णन ‘वाईटांचे भांडार’ असे केले होते; कारण त्यांनी चर्चची सत्ता पसरवण्यापासून थांबवले होते.

८. हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनरींना शासनकर्त्यांकडून विशेष सन्मान

ही सर्व मोठमोठ्या मिशनर्‍यांची काळी कर्मे आहेत. स्वतंत्र भारतात त्यांचे काम अधिक सोपे झाले ! आपले शासनकर्ते आणि राजकीय पक्ष यांनी त्यांना विशेष सन्मान अन् सुविधा दिल्या. राजकीय सहकार्याने डाव्या इतिहासकारांनी ‘ब्राह्मणवादा’ला लक्ष्य केले. विविध नेत्यांनी मतपेढी सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांचा ‘बळीचा बकरा’ म्हणून वापर केला. अशा प्रकारे चौफेर प्रचारामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनाही स्वामी विवेकानंद यांना विसरून गेल्या. जे म्हणाले होते, ‘‘ब्राह्मणच आपल्या पूर्वजांचे आदर्श होते.’’ आपल्या सर्व शास्त्रांमध्ये ब्राह्मणांचा आदर्श विशेष ठेवण्यात आला आहे. भारतातील मोठ्यात मोठ्या राजांचे वंशज असे सांगण्याचा प्रयत्न करतात की, ‘ते सर्वस्वत्यागी, वनवासी, फळे-मुळे सेवनहारी आणि वेदपाठी ऋषी यांची मुले आहेत.’

हा महान वारसा विसरून काही हिंदु म्हणवणार्‍या नेत्यांनी मंडल आयोगाची स्थापना (वर्ष १९७९) करणे आणि नंतर त्याचा अहवाल (वर्ष १९९०) स्वीकारणे यांसाठी उघडपणे साहाय्य केले. त्यात मिशनर्‍यांचा ब्राह्मणविरोध जशास तसा मांडण्यात आला आहे. हेच त्यांच्या शिफारसींचे मूळ तर्क होते ! पुढे मिशनर्‍यांनी निर्माण केलेला उघड खोटेपणा भारत सरकारचा अधिकृत धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि राष्ट्र्रवादी सिद्धांत बनला. असे यश ख्रिस्ती मिशनर्‍यांना इंग्रजांच्या काळातही मिळाले नव्हते !

९. भारतीय शासनकर्त्यांकडून ख्रिस्ती मिशनर्‍यांना मोकळे रान

इंग्रजांनी मिशनर्‍यांवर अंकुश ठेवला होता. याउलट भारतीय शासनकर्त्यांनी त्यांना मोकळे रान करून दिले. परिणामी संपूर्ण देशभर चर्च-मिशनर्‍यांची धोकादायक घाण विनाअडथळे पसरत राहिली. हिंदु मंदिरांमध्ये येशू आणि मेरी यांची चित्रे लावणे, हिंदु कलाकुसरप्रमाणे चर्च बनवणे आणि निष्पाप हिंदूंना अडकवणे, औषधाने आजार बरे करून येशूची शक्ती सांगणे, हिंदु देवीदेवतांचा अवमान करून त्यांना कमकुवत म्हणणे, कर्ज देणे किंवा मिशनरी शाळांमध्ये प्रवेश देण्याचे प्रलोभन देऊन लोकांना हिंदु समाजापासून वेगळे करणे, अशा गोष्टी केल्या जात आहेत. आपल्या शासनकर्त्यांना सर्व काही ठाऊक आहे; पण ते लोभापायी आंधळे होऊन आणि अल्पसंख्यांकांच्या सवलती वाढवून तीच फांदी तोडण्यासाठी सहकार्य करत आहेत, ज्यावर ते बसले आहेत.’

– डॉ. शंकर शरण, देहली (१५.२.२०२३)

(साभार : https://cisindus.org)

संपादकीय भूमिका

ख्रिस्त्यांकडून केल्या जाणार्‍या ब्राह्मणविरोधाचे मूळ जाणून सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक !