पावसाळ्यापूर्वीच परशुराम घाटातील महामार्गाचे काम पूर्ण करून दुतर्फा वाहतूक चालू होण्याची शक्यता !

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवसातील ५ घंटे वाहसुकीस बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून तो बुजवण्याचे काम चालू करण्यात आले आहे.

चांदूर रेल्‍वे येथील मुंदडा महाविद्यालयावर प्रशासक नेमणार !

अशोक शिक्षण संस्‍थेद्वारा संचालित चांदूर रेल्‍वे येथील मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्‍य, विज्ञान महाविद्यालयावर प्रशासक नेमण्‍याच्‍या निर्णयावर विद्यापिठाने शिक्‍कामोर्तब केले आहे.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण !

बारसू-सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाचे काम चालू आहे. ज्या भूमीमालकांनी प्रकल्पासाठी भूमीचे संमतीपत्र दिले, त्या भूमीमालकांच्या जागेत हे माती सर्वेक्षणाचे काम चालू आहे.

छत्रपती शिवरायांच्‍या पुतळ्‍याला अकोल्‍यातील बार्शी टाकळीच्‍या धर्मांध नगरसेवकांचा विरोध !

हा आहे ‘धर्मनिरपेक्षते’चे ढोंग रचणार्‍या काँग्रेसचा खरा तोंडवळा ! छत्रपती शिवरायांना ‘निधर्मीवादी’ आहे ? अशा हिंदूंंविरोधी काँग्रेसला जनतेनेच तिची जागा आता दाखवून द्यावी !

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस रस्‍त्‍यावर भीषण अपघात !

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस रस्‍त्‍यावर खोपोली ‘एक्‍झिट’जवळ २७ एप्रिल या दिवशी १२ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. १२ गाड्या एकमेकांवर जोरात आदळल्‍या असून अपघातात गाड्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, तर काही जण घायाळ झाले आहेत.

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी १८ सहस्र रुपयांची लाच घेतांना दापोलीतील वैद्यकीय अधिकारी कुराडे यांना पकडले !

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल !

‘पहिले पाऊल – शाळापूर्व तयारी’ अभियानात सर्वांनी सहभागी व्‍हावे ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

राज्‍य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्‍याचे काम ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानांतर्गत चालू आहे.

ब्रिटनमध्ये कारागृहात कैद्यांचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

कारागृहांनाही धर्मांतराचा अड्डा बनवणारे कट्टरतावादी मुसलमान कैदी ! स्वतःला पुढारलेला आणि निधर्मीवादी म्हणवून घेणार्‍या ब्रिटनमध्ये इस्लाम कसा फोफावत आहे, हे यातून दिसून येते !

रत्नागिरी येथे ३० एप्रिलला पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे व्याख्यान

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या तेजस्वी-ओजस्वी, धगधगत्या वाणीतून देव, देश आणि धर्म समजण्यासाठी सर्वांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

अल्पवयीय मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा

राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.