रत्नागिरी येथे ३० एप्रिलला पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे व्याख्यान

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी

रत्नागिरी, २७ एप्रिल (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन हेतूचे स्मरण करत कृतीवत जीवन जगणारी हिंदु तरुण पिढी घडावी, या ध्यासाने कार्य करणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. हे व्याख्यान रविवार, ३० एप्रिल २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता सुरभी हॉटेलसमोर, पाटीदार भवन, टी.आर्.पी. येथे होणार आहे.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या तेजस्वी-ओजस्वी, धगधगत्या वाणीतून देव, देश आणि धर्म समजण्यासाठी सर्वांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.