रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
दापोली – शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणासाठी वडिलांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लाच घेणार्या दापोली उप जिल्हा रुग्णालयातील वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडकले. ही कारवाई २७ एप्रिल या दिवशी करण्यात आली.
येथील एका २९ वर्षीय तरुणाने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार केली होती. तरुणाच्या वडिलांनी शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी अर्ज प्रविष्ट केला होता. त्यासाठी वडिलांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आवश्यक होते. या प्रमाणपत्रासाठी तो तरुण दापोली उप जिल्हा रुग्णालयात गेला होता. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कुराडे यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १८ सहस्र रुपये देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाच्या वतीन २७ एप्रिल या दिवशी सापळा रचण्यात आला. १८ सहस्र रुपये रक्कम स्वीकारतांना डॉ. सुरेश कुराडे यांना पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे आणि, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी केली.
संपादकीय भूमिका
|