नागपूर येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर उभे रहाणार संत जगनाडे महाराज यांचे स्‍मारक !

 संत जगनाडे महाराज यांची मूर्ती (संग्रहित चित्र)

मुंबई, २७ एप्रिल (वार्ता.) – नागपूर येथील जगनाडे चौक येथे ८ सहस्र चौरस फूट जागेवर संत जगनाडे महाराज यांच्‍या भव्‍य स्‍मारकाची निर्मिती करण्‍यात येणार आहे. यासाठी ६२७ लाख २३ सहस्र रुपयांची तरतूद करण्‍यात आली आहे.

महाराष्‍ट्र शासनाने अर्थसंकल्‍पामध्‍ये नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांचे स्‍मारक उभारण्‍याची घोषणा केली होती. या स्‍मारकाच्‍या ठिकाणी कलादालन, वाहनतळ, वाचनालय यांसह अन्‍य सुविधा असणार आहेत. २६ एप्रिल या दिवशी शासन आदेश प्रसिद्ध करून राज्‍यशासनाने या स्‍मारकाला मान्‍यता दिली आहे.