नाशिक येथे वीज अभियंता ४० सहस्रांची लाच घेतांना अटक !

भ्रष्‍टाचाराने पोखरलेले वीज वितरण प्रशासन !

( संग्रहीत छायाचित्र )

नाशिक – जिल्‍ह्यात घोटी आणि वैतरणा भागातील एका उद्योजकाला वीज मीटरवर वाढीव भार संमत करून देण्‍याच्‍या मोबदल्‍यात ४० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारणारे वीज वितरण आस्‍थापनाचे साहाय्‍यक अभियंता सचिन चव्‍हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली. ‘वॉटर प्‍यूरिफिकेशन प्‍लांट’मध्‍ये सद्यःस्‍थितीत असणार्‍या वीज मीटरवर वाढीव भार संमत करायचा होता. तसा अर्ज त्‍यांनी चव्‍हाण यांना दिला; मात्र चव्‍हाण यांनी ४० सहस्र रुपयांच्‍या लाचेची मागणी केली. त्‍यानंतर तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.