विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाकडून एकाच दिवशी ३ ठिकाणी गोरक्षणाची कार्यवाही !

अनेक गोवंशियांना जीवनदान, तर मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त

पशुवधगृहाकडे नेण्यासाठी दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेतील गोवंशीय

सोलापूर, ३ एप्रिल (वार्ता.) – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ ठिकाणी कारवाई करत गोवंशियांना जीवदान देण्यात आले. पहिल्या कार्यवाहीत पोलिसांच्या साहाय्याने ३५ गोवंशियांना जीवदान देण्यात आले, तसेच दुसर्‍या कारवाईत धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका येथील पशूवधगृहावर पोलिसांच्या साहाय्याने धाड टाकून तेथे एक ‘मिनी आयशर’ गाडी भरून गोमांस पकडण्यात आले. पंढरपूर येथे १३ गोवंशियांना दाटीवाटीने कोंबून दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत निदर्शनास आले. या १३ गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेत असतांना त्यांना जीवदान देण्यात आले.

गोवंशियांचे प्राण वाचवणारे गोरक्षक

पंढरपूर येथील कारवाई यशस्वी करण्यासाठी पुणे येथील गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी यांचे सहकार्य लाभले, तसेच सर्व कारवाया यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, उपजिल्हाप्रमुख योगीराज जडगोणार, सर्वश्री प्रतीक भेगडे, पवनकुमार कोमटी, कृष्णा सातपुते, विनायक निकते, तानाजी अस्वले, राहुल लंगडेवाले, दादासाहेब ढेरे, सिद्राम चरकूपल्ली, अविनाश कैय्यावाले, अविनाश मदनावाले, सतीश सिरसिल्ला, विरू मंचाल, आदी गोरक्षकांचे सहकार्य लाभले.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून प्रशासन आणि पोलीस गोरक्षण करणार का ?