कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु अधिवेशन म्हणजे धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

१०० हून अधिक धर्मप्रेमींचा अधिवेशनात सहभाग

श्री. मनोज खाडये

कोल्हापूर, ३ एप्रिल (वार्ता.) – हे अधिवेशन असले तरी हा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संघभाव निर्माण होऊन ‘संघेशक्ती: कलौयुगे ।’ (अर्थ : कलियुगात संघटित रहाण्याने शक्ती प्राप्त होते.) या धर्मवचनाप्रमाणे धर्मावर होणार्‍या आघातांचा संघटितपणे विरोध करण्याची दिशा निश्चित करण्यासाठी हे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील शिवानी मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनाला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु स्वाती खाडये, श्री. मनोज खाडये, डॉ. मानसिंग शिंदे

सनातन संस्थेचे श्री. विलास वेसणेकर यांनी प्रारंभी शंखनाद केला, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये, डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्र पठण करून संतांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी केले. अधिवेशनाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी सांगितला. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधनेची आवश्यकता !’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

व्यासपिठावर उपस्थित डावीकडून डॉ. मानसिंग शिंदे, सद्गुरु स्वाती खाडये, श्री. मनोज खाडये
अधिवेशनाला उपस्थित धर्मप्रेमी

क्षणचित्र

या वेळी ह.भ.प. विठ्ठल तात्या पाटील (वय ७५ वर्षे) यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय मुरकुटे यांनी त्यांचा सत्कार केला.