कर्जत (रायगड) येथे आढळली १०० हून अधिक गोवंशियांची कातडी !

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगड – कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-धामद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका पठारावर हत्या केलेल्या गोवंशियांची फेकून दिलेली कातडी आढळली आहे. या कातड्यांची संख्या १०० हून अधिक आहे. येथील ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वेबपोर्टलवर व्हिडिओसह याविषयीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.

यामध्ये गोवंशियांची शिंगे, पायांची खुरे दिसत आहेत. या भागात वारंवार गोमाता आणि गोवंशीय यांची हत्या करून त्यांचे मांस अवैधपणे विक्री करण्यात येण्याचे प्रकार घडत आहेत. त्या विरोधात गुन्हेही नोंद झाले आहेत; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या गोवंशियांच्या कातडीमुळे अद्यापही येथे मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या होत असल्याचे हे प्रमाण आहे. हत्या झालेल्या गोवंशियांमध्ये गायींचाही समावेश असण्याची शक्यता आहे. (याविषयी राज्य सरकारने सखोल अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई करावी. – संपादक)

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायदा असूनही राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत गोवंशियांच्या हत्या !