सातारा येथील १ सहस्र २८८ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या !

सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण ६ संवर्गातील १ सहस्र २८८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी !

हिंदुप्रेमींकडून मागणी येण्याअगोदरच सर्वत्रचे प्रशासन आपापल्या भागातील अवैध दर्गे हटवत का नाही ?

चुनाभट्टी (मुंबई) येथे इमारतीला आग

चुनाभट्टी येथील गोदरेज इमारतीला २४ मार्च या दिवशी आग लागली. १३ मजली इमारतीच्या वरचे ३ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ११ व्या मजल्यावर आग लागून ती वर पसरत गेल्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादित करतांना विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देऊनही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सहस्रावधी प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही.

ग्वाल्हेरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

सकाळी साडेदहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ४ इतकी होती. या धक्क्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. 

खलिस्तानसाठी स्वतंत्र आर्थिक चलन आणि सैन्य उभारण्याचे अमृतपाल सिंंह याने रचले होते षडयंत्र !

‘एवढे सर्व होईपर्यंत भारताची सुरक्षायंत्रणा काय करत होती ?’ असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडणे साहाजिक आहे !

उत्तरप्रदेशमध्ये २ रोहिंग्यांना अटक

देशामध्ये घुसखोरी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्यापर्यंत रोहिंग्ये पोचतात, यासाठी त्यांना त्यांचा देशद्राही धर्मबंधू साहाय्य करतात, याकडे पोलीस, प्रशासन आणि निधर्मी राजकीय पक्ष कधी गांभीर्याने पहाणार ?

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार !

‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाविषयी ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

ग्रँटरोड (मुंबई) येथे ५ जणांवर चाकूंचे आक्रमण

ग्रँटरोड येथील एका इमारतीतील चेतन गाला या व्यापार्‍याने त्याच्या शेजारच्या घरातील ५ जणांवर चाकूने आक्रमण केले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एक वयस्कर होते, तर एक महिला आहे.