चुनाभट्टी (मुंबई) येथे इमारतीला आग

मुंबई – चुनाभट्टी येथील गोदरेज इमारतीला २४ मार्च या दिवशी आग लागली. १३ मजली इमारतीच्या वरचे ३ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ११ व्या मजल्यावर आग लागून ती वर पसरत गेल्याची शक्यता आहे. २ कर्मचारी आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.