उत्तरप्रदेशमध्ये २ रोहिंग्यांना अटक

  • ३ भारतीय पारपत्र, मतदान ओळखपत्रे सापडली !

  • स्थानिक मुसलमानांकडून साहाय्य

रोहिंग्या : महंमद अरमान आणि अब्दुल अमीन

बलिया (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने येथे धाड टाकून २ रोहिंग्यांना अटक केली आहे. अबू तल्हा उपाख्य महंमद अरमान आणि अब्दुल अमीन अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ भारतीय पारपत्रे आणि अन्य ओळखपत्रे जप्त करण्यात आली. त्यांना इजहारूल हक या स्थानिक नागरिकाने साहाय्य केले होते. त्याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अन्य ४ जण पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अरमान भारतीय पारपत्राद्वारे आखाती देशांमध्ये जाऊन आला होता. त्याने बंगालच्या हुगळी येथे भूमी खरेदी करून घरही बांधले आहे. भूमीची नोंदणी करतांना त्याने भारतीय ओळखपत्र सादर केले होते. नंतर त्याने आधारकार्ड बनवतांना बंगालमधील स्थानिक आमदाराच्या साहाय्याने उत्तरप्रदेशाऐवजी हुगळी येथील पत्ता दिला होता. अरमान याच्याकडून मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड हेही सापडले आहे. त्याने वर्ष २००८ मध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्याला बलिया येथे सगीर अहमद याने त्याच्या दुकानात नोकरीवर ठेवले होते. त्याला अरमान रोहिंग्या आहे, हे ठाऊक होते.

संपादकीय भूमिका

  • देशामध्ये घुसखोरी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्यापर्यंत रोहिंग्ये पोचतात, यासाठी त्यांना त्यांचा देशद्रोही धर्मबंधू साहाय्य करतात, याकडे पोलीस, प्रशासन आणि निधर्मी राजकीय पक्ष कधी गांभीर्याने पहाणार ?