शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी !

श्री. आनंद दवे

पुणे – गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित केले होते. त्या वेळी त्यांनी माहीम आणि सांगली येथील कुपवाडमधील दर्ग्यांचा विषय मांडला होता. त्यानंतर एका दिवसात माहीम येथील अनधिकृत दर्गा हटवण्यात आला; मात्र शनिवारवाड्यावरील दर्ग्याचे सूत्र का मांडले नाही ? असा प्रश्‍न हिंदु महासभेचे आनंद दवे यांनी राज ठाकरेंना विचारला आहे. शनिवारवाडा परिसरातील दर्गाही अनधिकृत असून त्या दर्ग्याविषयीही निर्णय घ्यावा, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.

दवे पुढे म्हणाले की, शनिवारवाड्यातील दर्ग्याच्या बाजूला येथे मशीद होणार नाही, या जागेचा व्यावसायिक वापर होईल. असा एक फलक लावण्यात आला आहे. मुळात ही जागा मशिदच्या ट्रस्टीच्या नावे आहे. अलका चौकातही एक मोठी मशीद उभी आहे. मुसलमान वस्ती शून्य असतांना येथे मशीद उभी राहू नये, तसेच महानगरपालिकेने अनुमती देऊ नये, या उद्देशाने आम्ही जनजागृती करत आहोत.

संपादकीय भूमिका

  • हिंदुप्रेमींकडून मागणी येण्याअगोदरच सर्वत्रचे प्रशासन आपापल्या भागातील अवैध दर्गे हटवत का नाही ?
  • अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?