धुळे जिल्ह्यात ५ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपुजनाने हिंदु नववर्षाचे स्वागत आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प !

महान हिंदु कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी, ८ लक्ष ५३ सहस्र १२५ व्या नववर्षाचा आरंभ या गुढीपाडव्याला होत आहे ! त्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे जिल्ह्यात मोहाडी, दिवाणमळा, दोंडाईचा, धुळे शहरातील एम्.आय.डी.सी. येथे आणि जुने धुळे येथे सामूहिक गुढीपूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली.

संयुक्त राष्ट्रांच्या आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारताचा क्रमांक पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याही खाली !

ज्या देशांत लोकांना खाण्यासाठी अन्नही मिळत नाही, त्या देशांतील व्यक्ती भारतियांपेक्षा अधिक आनंदी आहेत, असे कधीतरी म्हणता येऊ शकते का ?

नवी मुंबईत विविध ठिकाणी भव्य नववर्ष स्वागतयात्रा पार पडल्या !

गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी, नेरूळ, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

भविष्यात सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल ! – धीरज वाटेकर, पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते

आपण स्वतःहून एखाद्या कुंडीत किंवा भूमीत बियाणे घालून झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केल्यास ते झाड आपल्याशी हितगुज करत असल्याचे जाणवेल. यातून आपल्याला निसर्गाशी एकरूप होता येईल, ‘वृक्षरक्षक’ होता येईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मायणी (जिल्हा सातारा) येथील ‘रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर’च्या बनावट डॉक्टर प्रकरणी १ मासात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर अँड रुग्णालय मायणी’ येथील संस्थेत बनावट प्रमाणपत्र देण्याचे व्यवहार करून बनावट आधुनिक वैद्य (डॉक्टर) सिद्ध केल्याच्या गंभीर तक्रारींची नोंद राज्य शासनाने घेतली आहे.

श्रीसाईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवत कायम करून वेतनातील फरक द्या ! – काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी

श्रीसाई संस्थानमध्ये कायम कर्मचारी नियुक्तीचा निर्णय घेतला, तर पंढरपूर येथील मंदिरातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व मंदिरात कायम कर्मचार्‍यांविषयी निर्णय घ्यावा लागेल. आवश्यकता भासली, तर कर्मचारी नियुक्ती कायद्यात पालट करून निर्णय घेऊ. 

हिंदूंनो, पारतंत्र्यात ढकलणार्‍या साम्राज्यवाद्यांना पराजित करून भारताला अजेय राष्ट्र बनवण्यासाठी लढाऊ वृत्ती हवी !

अजेय राष्ट्र भारताला बनवण्यासाठी हिंदु समाजाने स्वतःमध्ये लढाऊ वृत्ती जागृत करायला हवी ! म्हणून हिंदूंनो, शस्त्रधारी अन् दुष्ट शक्तींसाठी काळ ठरणार्‍या देवतांची उपासना केवळ भजन करून करू नका, तर त्यांच्यातील लढाऊ वृत्तीही अंगी बाणवून भारताला अजेय साम्राज्य बनवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले