गुढीपाडव्यानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश
‘भारताच्या इतिहासामध्ये सात्त्विक आणि पराक्रमी राज्यकर्त्यांचा काळ हा ‘सुवर्णकाळ’ म्हणून गणला जातो; पण या इतिहासाची दुसरी बाजू बघितली, तर त्यामध्ये पारतंत्र्याचा, म्हणजेच परकियांनी भारतावर राज्य केल्याचाही इतिहास आहे. रामायण काळात लंकेतील रावणाने भारताच्या काही भागावर राज्य केले. भारताला त्याच्या पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी प्रभु श्रीरामाला अवतरावे लागले. गेल्या २००० वर्षांचा इतिहास बघता भारताच्या काही भागांवर ग्रीक, पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि मुसलमान यांनी अधिक काळ राज्य केले. ‘समाजाचा क्षात्रभाव विलुप्त झाला की, परकीय साम्राज्यवादी शक्ती प्रबळ होतात आणि पारतंत्र्य येते’, हा जागतिक सिद्धांत आहे. अनेकदा हा परकियांचा साम्राज्यवाद क्षात्रभावहीन मानसिकतेच्या हिंदूंना पारतंत्र्यात ढकलणारा ठरला, हे हिंदू कधी शिकणार ? खरे तर पारतंत्र्यात ढकलणार्या साम्राज्यवाद्यांना पराजित करण्यासाठी आणि पुन्हा कधीही पारतंत्र्य येऊ नये, असे अजेय राष्ट्र भारताला बनवण्यासाठी हिंदु समाजाने स्वतःमध्ये लढाऊ वृत्ती जागृत करायला हवी !
म्हणून हिंदूंनो, शस्त्रधारी अन् दुष्ट शक्तींसाठी काळ ठरणार्या देवतांची उपासना केवळ भजन करून करू नका, तर त्यांच्यातील लढाऊ वृत्तीही अंगी बाणवून भारताला अजेय साम्राज्य बनवा !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले