चीन आमचे नेते आणि अधिकारी यांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे !
मायक्रोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आरोप !
मायक्रोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आरोप !
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कबुतराच्या पायावर कॅमेर्यासारखे लावलेले उपकरण आढळले !
या आक्रमणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चर्चच्या परिसरात नाकाबंदी केली आहे.
आरे कॉलनीमध्ये भाड्याने देण्यात आलेल्या भूमीचे करार समाप्त होऊनही त्या जमिनी सोडण्यात आलेल्या नाहीत. हे अतिक्रमण हटवण्याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.
विद्यार्थिनींसाठी १ रुपयात ८ सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. या योजनेचे प्रारूप सिद्ध करून येत्या १५ दिवसांत ही योजना लागू करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
राज्यात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ष २०१७ मध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवरील वस्तू अन् सेवा करातील २८ कोटी ३६ लाख रुपये ठेकेदाराच्या खिशात गेले आहेत.
पेपरफुटी आणि अनियमितता यांमुळे वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही. येत्या २ मासांत ही भरती आम्ही पूर्ण करू, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.
यशवंतगडाच्या तटबंदीला लागून, तसेच सी.आर्.झेड्. कायद्याचे उल्लंघन करून या क्षेत्रात असलेल्या डोंगरात अवैध उत्खनन आणि बांधकाम तसेच विविध प्रजातींची झाडे वनविभागाच्या अनुमतीविना कापून पर्यावरणाचा र्हास करण्यात आला आहे.
अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंचानी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.