‘आत्‍मनिर्भर’वर भर !

जगातील पाचवी अर्थव्‍यवस्‍था असतांना जनता स्‍वतःच्‍या किमान गरजा भागवण्‍यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्‍प थेट सर्वसामान्‍यांचे दैनंदिन आयुष्‍य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्‍यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्‍हणता येईल !

‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस’ ठेवून भीमा नदीमध्‍ये वाळू उपसा चालू !

व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस ठेवून वाळू उपसा करण्‍यापर्यंत तस्‍करांची मजल जाते यावरून पोलीस, प्रशासन यांचा कोणताही वचक नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. अशा प्रशासनाकडून कायदा-सुव्‍यवस्‍था कधीतरी राखली जाईल का ? राजरोसपणे चालू असलेला वाळू उपसा प्रशासनाला का दिसत नाही ?

नागपूर जिल्‍ह्यातील विशेष पर्यटक बससेवा ९ मासांपासून बंद !

प्रवाशांची गैरसोय थांबवण्‍यासाठी एस्.टी. महामंडळाने तातडीने उपाययोजना काढाव्‍यात !

(म्‍हणे) ‘ख्रिस्‍ती धर्मगुरूंना मारहाण, त्‍यांच्‍यावरील धर्मांतराचे खोटे आरोप थांबवा !’

आरोप सिद्ध होण्‍याच्‍या अगोदरच ‘खोटे आरोप’, असे कसे काय म्‍हणता येईल ? धर्मांतर करतांना अनेक ख्रिस्‍ती धर्मगुरूंना पकडले आहे, अनेकांनी धर्मांतर केल्‍याचे मान्‍यही केले आहे.

‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस १० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी धावणार !

यापूर्वी महाराष्‍ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्‍यासाठी या एक्‍सप्रेसला ६ घंटे लागतील.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ३ सहस्र ६६८ वाहनांवर कारवाई

आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

शेलुद (जिल्‍हा संभाजीनगर) येथील निवडणुकीत संपूर्ण ग्रामपंचायतच विकली !

ग्रामपंचायतीमधील सदस्‍यांपासून थेट सरपंचपदासाठी एकूण २८ लाख ५६ सहस्र रुपयांची बोली लावण्‍यात आली होती.

पाकला झालेली दिखाऊ उपरती !

‘आपणच आतंकवादाची बीजे पेरली आहेत’, अशी स्‍वीकृती पाकचे संरक्षणमंत्री ख्‍वाजा आसिफ यांनी संसदेत दिली. पेशावर येथील मशिदीत झालेल्‍या बाँबस्‍फोटावरून ते बोलत होते.

वारंवार सर्दी, खोकला किंवा शिंका यांचा त्रास होण्‍यामागील दैनंदिन दुर्लक्षित कारण कोणते ?

सध्‍या अनेक लोक वारंवार सर्दी, खोकला होणे किंवा शिंका येणे यांमुळे त्रासलेले आहेत. असे होण्यामागे एक सर्वसाधारण कृती कारण ठरू शकते आणि ती बहुधा दुर्लक्षित रहाते. ही कृती म्‍हणजे सध्‍या ‘थंड ऋतु असूनही प्रतिदिन शिरःस्नान (डोक्‍यावरुन अंघोळ) करणे’.