वारंवार सर्दी, खोकला किंवा शिंका यांचा त्रास होण्यामागील दैनंदिन दुर्लक्षित कारण कोणते ?
सध्या अनेक लोक वारंवार सर्दी, खोकला होणे किंवा शिंका येणे यांमुळे त्रासलेले आहेत. असे होण्यामागे एक सर्वसाधारण कृती कारण ठरू शकते आणि ती बहुधा दुर्लक्षित रहाते. ही कृती म्हणजे सध्या ‘थंड ऋतु असूनही प्रतिदिन शिरःस्नान (डोक्यावरुन अंघोळ) करणे’.