केंद्रशासन प्रतिकिलो २९ रुपये ५० पैसे या दराने गव्हाच्या पिठाची विक्री करणार !

‘नाफेड’ आणि ‘एन्.एफ्.सी.सी.’ या संस्थांच्या माध्यमातून ६ फेब्रुवारीपासून  ही विक्री केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

मदरशांत जर वासनांध आणि खुनी मुले निपजत असतील, तर अशा मदरशांवर बंदी घालणे आवश्यक !

‘बीबीसी’च्या माहितीपटावर बंदी का घातली ?, याचे उत्तर द्या !  

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश

सनातन धर्मावर आक्रमण केल्यास पळता भुई थोडी होईल ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.

जोशीमठ गावाप्रमाणेच आता जम्मू-काश्मीरच्या एका गावातील घरांनाही तडे !

डोडा येथील ५० घरे असणार्‍या नयी बस्ती नावाच्या गावामधील २० घरांना आणि एका मशिदीला तडे गेल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासनाने तज्ञांच्या एका पथकाला गावात पाठवले असून ते याची पडताळणी करणार असून त्यामागील कारणांचा शोध घेणार आहेत.

आसाममध्ये बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी राज्यभरात बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक केली आहे.

अमृतसरजवळ सैनिकांनी पाडले पाकिस्तानी ड्रोन !

सीमारेषेवरील भारताच्या बाजूच्या तारेच्या कुंपणाजवळ ते पडले. त्याला लावण्यात आलेल्या काही संशयित वस्तू आढळल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आली असून त्याची तपासणी केली जात आहे.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ही ‘अयोध्या बुद्ध विहार’ घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी खंडपिठाने, ‘न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणाविषयी निकाल दिला आहे.

अदानी उद्योगसमुहाच्या शेअर्समध्ये ३५ टक्क्यांची घसरण

अशा प्रकारे मागील ९ दिवसांत या समुहाचे शेअर्स ७० टक्क्यांनी घसरले आहेत. या घटनाक्रमानंतर अमेरिकेच्या ‘डाऊ जोंस स्टॉक एक्सचेंज’ने अदानी एंटरप्रायझेसला बाहेर काढले आहे.

‘अमूल’च्या दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपयांची वाढ

आता ‘अमूल गोल्ड’ दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, ‘अमूल ताजा’ ५४ रुपये प्रति लिटर, ‘अमूल’ गायीचे दूध ४६ रुपये प्रति लिटर आणि ‘अमूल ए२’ म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रति लिटर झाली आहे.