‘अमूल’च्या दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपयांची वाढ

नवी देहली – ‘अमूल’ने दुधाच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. हे नवीन दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत.

यामुळे आता ‘अमूल गोल्ड’ दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, ‘अमूल ताजा’ ५४ रुपये प्रति लिटर, ‘अमूल’ गायीचे दूध ४६ रुपये प्रति लिटर आणि ‘अमूल ए२’ म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रति लिटर झाली आहे.