जोशीमठ गावाप्रमाणेच आता जम्मू-काश्मीरच्या एका गावातील घरांनाही तडे !

डोडा (जम्मू-काश्मीर) – येथील ५० घरे असणार्‍या नयी बस्ती नावाच्या गावामधील २० घरांना आणि एका मशिदीला तडे गेल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासनाने तज्ञांच्या एका पथकाला गावात पाठवले असून ते याची पडताळणी करणार असून त्यामागील कारणांचा शोध घेणार आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ‘गेल्या काही वर्षांपासून या भागात रस्त्यांची कामे आणि पाण्याचे झिरपणे यांमुळे कदाचित् घरांना तडे गेल्याची शक्यता आहे.’ यापूर्वी उत्तराखंडमधील जोशीमठ गावामध्ये भूस्खलनामुळे घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे तेथील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.