उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

लक्ष्मणपुरी – देवबंद जिल्ह्यातील संपला बक्कल गावातील रहिमिया मदरशात शिकणार्‍या एका १३ वर्षीय मुलावर त्याच मदरशात शिकणार्‍या मुलाने लैंगिक अत्याचार केले. ‘याविषयी पीडित मुलगा समाजात जाऊन सांगेल’, या भीतीने लैंगिक अत्याचार करणार्‍या मुलाने त्याची हत्या केली.

३० जानेवारी या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पीडित मुलगा घरातून बाहेर पडला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याला शोधायला आरंभ केला. दुसर्‍या दिवशी सकाळी एका शेतात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर कपडे नसल्यामुळे त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. पोलीस अन्वेषण करत असतांना ‘हत्या करण्यात आलेल्या मुलासोबत आणखी ५ मुले होती’, अशी माहिती त्यांना मिळाली. त्या वेळी पोलिसांनी या ५ मुलांना कह्यात घेतले. चौकशी करतांना एका मुलाने लैंगिक अत्याचार करून मुलाची हत्या केल्याची स्वीकृती दिली. या मुलाने प्रथम पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केले नंतर त्याची गळा चिरून हत्या केली.

संपादकीय भूमिका

मदरशांत जर वासनांध आणि खुनी मुले निपजत असतील, तर अशा मदरशांवर बंदी घालणे आवश्यक !