मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाच्या वेळी विदर्भवाद्यांकडून गोंधळ !

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

वर्धा – येथे चालू झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणासाठी उभे रहाताच विदर्भवाद्यांनी पत्रके फेकून वेगळ्या विदर्भाची मागणी केली. या वेळी घोषणाही देण्यात आल्या. संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्याही भाषणाच्या वेळी घोषणा देण्यात आल्या. या प्रकारामुळे संमेलनात काही काळ तणाव तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी विदर्भवाद्यांना फरफटत बाहेर नेले.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘हे सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे आहे. तुमचेही म्हणणे आम्ही ऐकू.’’ त्या वेळी विदर्भवाद्यांनी ‘शेतकर्‍यांवर बोला, वेगळ्या विदर्भावर बोला’, असे आवाहन करून गोंधळ घातला.

संपादकीय भूमिका 

मराठी भाषेच्या संदर्भातील संमेलनात वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाणे दुर्दैवी !