कराची (पाकिस्तान) येथे जिहादी संघटनेने केली अहमदिया मुसलमानांच्या मशिदीची तोडफोड !

अहमदिया मुसलमानांच्या मशिदीची तोडफोड

कराची (पाकिस्तान) – येथे ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ या जिहादी संघटनेने अहमदिया मुसलमानांच्या एका मशिदीची तोडफोड केली. गेल्या काही दिवसांतील अशा प्रकारची ही ५ वी घटना असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानमध्ये अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमान’ समजले जात नाही. त्यांना अल्पसंख्यांकांप्रमाणे वागणूक दिली जाते. यापूर्वी काही अहमदिया मुसलमानांना पैगंबरांचा अवमान केल्याच्या खोट्या आरोपांखाली फाशीचीही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) महंमद नईम चट्ठा याने गर्भवती अहमदिया मुसलमान महिलांवर आक्रमण करण्याचे आवाहन केले होते. ‘असे केले, तर अहमदिया मुसलमान जन्मालाच येणार नाही’, असे हा मौलवी म्हणत होता.