दिव्याखाली अंधार !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री गौड ब्राह्मण समाजाच्‍या जातपंचायतीतील पंचांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

समाजातून बहिष्‍कृत करण्‍याचे प्रकार या काळातही घडणे, हे समाज व्‍यवस्‍थेसाठी लज्‍जास्‍पद आहे !

‘समर्थभक्‍त माधवराव गाडगीळ मित्र परिवारा’च्‍या वतीने महाशिवरात्र कीर्तन महोत्‍सवाचा संकल्‍प पार पडला !

येथील श्री काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात महाशिवरात्रीच्‍या निमित्त कीर्तन महोत्‍सवाचा प्रारंभ रुद्राभिषेक, हिंदु राष्‍ट्रासाठी प्रतिज्ञा आणि संकल्‍प करून करण्‍यात आला. १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिवलीलामृत पारायण, कीर्तन-प्रवचने, अखंड नामजप, आरोग्‍य पडताळणी शिबिर असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहेत

कराड येथील सनातनचे हितचिंतक श्री. नामदेव थोरात यांना उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्याविषयी पुरस्‍कार !

‘द न्‍यूज लाईन’ या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्‍या तृतीय वर्धापनदिनानिमित्त येथील सुप्रसिद्ध ‘शिवराज ढाब्‍या’चे मालक श्री. नामदेव थोरात यांना व्‍यावसायिक क्षेत्रात केलेल्‍या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याबद्दल ‘उद्योजकता प्रेरणा’ पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले.

पुरस्‍काराचा मान !

यावर्षी चांगल्‍या व्‍यक्‍तींना पुरस्‍कार दिल्‍याचा आनंद जरी असला, तरी राष्‍ट्रघातकी आणि राष्‍ट्र किंवा समाज यांप्रती काहीही भरीव कामगिरी न करणारे लोक यांचा गौरव होणे, हे सामान्‍य जनतेच्‍या पचनी न पडणारे ! त्यातल्या त्यात अध्‍यात्‍मक्षेत्रातील व्‍यक्‍तींना ‘पद्म पुरस्‍कार’ मिळणे, ही येत्‍या काळातील देशातील आध्‍यात्मिक वातावरणाची नांदी !

लाचेची मागणी करणार्‍या पोलीस चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

असे भ्रष्‍ट पोलीस जनतेला काय साहाय्‍य करणार ?