कराड येथील सनातनचे हितचिंतक श्री. नामदेव थोरात यांना उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्याविषयी पुरस्‍कार !

श्री. नामदेव थोरात

कराड, २७ जानेवारी (वार्ता.) – ‘द न्‍यूज लाईन’ या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्‍या तृतीय वर्धापनदिनानिमित्त येथील सुप्रसिद्ध ‘शिवराज ढाब्‍या’चे मालक श्री. नामदेव थोरात यांना व्‍यावसायिक क्षेत्रात केलेल्‍या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याबद्दल सोहळ्‍याचे प्रमुख पाहुणे ‘शिवम् प्रतिष्‍ठान’चे श्री. इंद्रजीत देशमुख यांच्‍या हस्‍ते ‘उद्योजकता प्रेरणा’ पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. या सन्‍मान सोहळ्‍यास कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, सोलापूर जिल्‍ह्यामधील तहसीलदार अमरजीत वाकडे, स.गा.म. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने आदी मान्‍यवर व्‍यासपिठावर उपस्‍थित होते.

श्री. नामदेव थोरात हे सनातनचे हितचिंतक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ असून त्‍यांचा हिंदुत्‍वाच्‍या कार्यात नेहमीच सहभाग असतो. ते प्रतिवर्षी १०० ‘सनातन पंचांग’ खरेदी करून आप्‍तेष्‍ट आणि नातेवाईक यांना भेट देत असतात, तसेच गोवा येथे होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनास’ खारीचा वाटा म्‍हणून प्रतिवर्षी साहाय्‍य करतात. सनातन संस्‍थेचे श्री. लक्ष्मण पवार यांनी या पुरस्‍कार सोहळ्‍यास उपस्‍थित राहून श्री. नामदेव थोरात यांना शुभेच्‍छा देऊन त्‍यांचे अभिनंदन केले.