‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, या भावाने सेवा करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. वैष्‍णवी वेसणेकर (वय २३ वर्षे) !

पौष कृष्‍ण तृतीया (१०.१.२०२३) या दिवशी कु. वैष्‍णवी वेसणेकर यांचा २३ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधिकेला लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्‍या छायाचित्रांच्‍या सूक्ष्मातील प्रयोगाच्‍या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘पू. वामन नामजप करतांना आणि पू. वामन यांची पारंपरिक पोशाखामधील भावमुद्रा’ अशी २ छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ‘त्‍या छायाचित्रांकडे पाहून साधकांना काय जाणवते ?’, असा सूक्ष्मातील प्रयोग करून काही अनुभूती आल्‍यास त्‍या लिहून पाठवण्‍यास सांगण्‍यात आले होते.

पूर्णवेळ साधना करता येण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना तळमळीने प्रार्थना करणारी आणि आश्रमात आल्‍यावर सेवेतून त्‍यांना अनुभवून आनंद घेणारी सोलापूर येथील कु. सुवर्णा श्रीराम (वय १८ वर्षे) !

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात वर्ष २०२१ मध्‍ये झालेल्‍या ‘युवा साधना शिबिरा’ला आले होते. तेव्‍हापासून मला पूर्णवेळ साधना करण्‍याची इच्‍छा होती. त्यासाठी आश्रमात येतांना आणि आल्‍यावर मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

अखिल भाविक वारकरी मंडळाच्‍या वतीने महिला वारकरी मेळावा उत्‍साहात !

अखिल भाविक वारकरी मंडळाच्‍या वतीने येथील निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे ७ जानेवारी या दिवशी महिला वारकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळाव्‍याला पोलीस आयुक्‍त दीपाली कोळे याही उपस्‍थित होत्‍या.

कचराप्रश्नी हलगर्जीपणा करणार्‍या पंचायतींवर कारवाई करा ! – उच्च न्यायालयाचा पंचायत संचालकांना आदेश

उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागणे, पंचायतींना लज्जास्पद ! पंचायत क्षेत्रातील कचर्‍याची विल्हेवाटही योग्यरित्या न लावणार्‍या पंचायती कसली जनसेवा करतात ?

विनाअनुमती ‘फ्‍लेक्‍स’वर कारवाई न केल्‍याने साहाय्‍यक आयुक्‍तांना आर्थिक दंडाची शिक्षा !

शहरातील फ्‍लेक्‍सबाजी थांबावी, याकडे दुर्लक्ष केल्‍याने महापालिकेच्‍या परिमंडळ २ मधील ३ साहाय्‍यक आयुक्‍तांना नोटीस बजावून दंडाची शिक्षा केली आहे.

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाने २ प्राध्‍यापकांना लाचखोरी प्रकरणी बडतर्फ केले !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्‍या विविध विभागांत कार्यरत असलेल्‍या ३ प्राध्‍यापकांची चौकशी चालू होती. यात पीएच्.डी. प्रकरणी विद्यार्थ्‍यांकडून पैसे घेणार्‍या डॉ. उज्‍ज्‍वला भडांगे, तर डॉ. नीरज साळुंखेे यांना वर्ष २०१३ मध्‍ये निलंबित केले होते.

भाजपच्‍या महिला नेत्‍याला बलात्‍काराची धमकी देणार्‍या समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍याला अटक

समाजवादी पक्षाच्‍या ट्‍विटर हँडलचे सदस्‍य मनीष अग्रवाल यांनी सामाजिक माध्‍यमांवरून भाजपच्‍या युवा मोर्चाच्‍या प्रसिद्धीमाध्‍यम प्रमुख ऋचा राजपूत यांना जिवे मारण्‍याची आणि बलात्‍कार करण्‍याची धमकी दिली.

कॉ. पानसरे हत्‍या प्रकरणात १० संशयितांवर दोष निश्‍चित : संशयितांकडून दोष अमान्‍य !

या खटल्‍यात एकूण १२ संशयित असून त्‍यांतील २ संशयित पसार आहेत, असे सरकार पक्षाचे म्‍हणणे आहे. वरील १० संशयितांपैकी समीर गायकवाड हे सध्‍या जामिनावर आहेत.

म्हादईप्रश्नी अधिवेशनात पूर्ण दिवस चर्चेसाठी सरकार ठराव मांडणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘राज्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु म्हादईचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संयम बाळगावा लागेल. सरकारच्या विरोधात निदर्शने होत आहेत आणि आम्ही प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.’’