संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या ३ प्राध्यापकांची चौकशी चालू होती. यात पीएच्.डी. प्रकरणी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणार्या डॉ. उज्ज्वला भडांगे, तर डॉ. नीरज साळुंखेे यांना वर्ष २०१३ मध्ये निलंबित केले होते. विद्यापिठाने त्यांना चौकशीनंतर गैरवर्तन आणि शिस्तभंग यांच्या अहवालावरून १० वर्षांनी बडतर्फ केले आहे. (बडतर्फीचा निर्णय घेण्यास विद्यापीठ प्रशासनाला एवढी वर्षे का लागली ? – संपादक) सोलापूर विद्यापिठात लीववर गेलेेल्या डॉ. बलभीम चव्हाण यांना चौकशीनंतर पुन्हा पर्यावरणशास्त्र विभागात रूजू करून घेण्यात आले आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. विद्यापिठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. उज्ज्वला भडांगे यांनी पीएच्.डी. संशोधक विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप होता. या संदर्भातील एक ‘ऑडिओ क्लिप’ प्रसारित झाली होती.
२. कुलगुरूंनी त्या वेळी त्यांना निलंबित केले होते. निलंबन काळात निवृत्त न्यायाधीश ए.टी.ए.के. शेख यांच्या वतीने केलेल्या विभागीय चौकशीत त्या दोषी आढळल्या होत्या. त्यामुळे कुलगुरूंनी त्यांना बडतर्फ केले आहे.
३. अन्य एका प्रकरणात डॉ. साळुंखेे चौकशीत दोषी आढळून आल्याने त्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.