भाजपच्‍या महिला नेत्‍याला बलात्‍काराची धमकी देणार्‍या समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍याला अटक

लक्ष्मणपुरी – समाजवादी पक्षाच्‍या ट्‍विटर हँडलचे सदस्‍य मनीष अग्रवाल यांनी सामाजिक माध्‍यमांवरून भाजपच्‍या युवा मोर्चाच्‍या प्रसिद्धीमाध्‍यम प्रमुख ऋचा राजपूत यांना जिवे मारण्‍याची आणि बलात्‍कार करण्‍याची धमकी दिली. यामुळे ऋचा राजपूत यांनी हजरतगंज पोलीस ठाण्‍यात अग्रवाल यांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट केली होती. (या तक्रारीत तथ्‍य असल्‍यास अग्रवाल यांच्‍यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्‍यक ! – संपादक) त्‍यानंतर अग्रवाल यांना अटक करण्‍यात आली. अग्रवाल यांना भेटण्‍यासाठी समाजवादी पक्षाचे अध्‍यक्ष अखिलेश यादव पोलीस मुख्‍यालयात गेले. त्‍यांच्‍यासमवेत समाजवादी पक्षाचे अनेक नेते आणि वरिष्‍ठ अधिकारी उपस्‍थित होते. यादव मुख्‍यालयात असतांना समाजवादी पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी मुख्‍यालयाच्‍या बाहेर धरणे आंदोलन केले. त्‍या वेळी सपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी पोलिसांना धक्‍काबुक्‍की केली. (गुंडांचा भरणा असलेला पक्ष समाजाला दिशादर्शन काय करणार ? – संपादक)