संमेलनात पंचपक्‍वानांसाठी अधिक खर्च करण्‍यापेक्षा तो पैसा मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन यांसाठी खर्च केला असता, तर ते उचित झाले असते !

मराठी साहित्‍य संमेलनाला २ सहस्र साहित्‍यिक, कवी, विचारवंत आणि साहित्‍य रसिक प्रतिनिधी उपस्‍थित रहाण्‍याची शक्‍यता आहे. आयोजकांकडून त्‍यांच्‍यासाठी पंचपक्‍वानांची रेलचेल असणार आहे.

कर्नाटक सरकारवर साखर उत्पादकांचा दबाव! – कर्नाटकमधील आपचे नेते राजकुमार तोप्पन्नवर यांचा आरोप म्हादई जलवाटप तंटा

नागरिकांची तृष्णा भागवण्यासाठी म्हादई नदीचे पाणी वळवण्याची आवश्यकता नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने दिलेले ५० टी.एम्.सी. पाणी कर्नाटक सरकार वाया घालवत आहे.

हिंदु धर्म सर्व मानवजातीला सामावून घेणारा ! – प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी

हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्‍या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर नतमस्तक !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील माऊली मंदिरात सदिच्छा भेट घेतली. दर्शनासाठी आल्यानंतर माऊलींचे मंदिर न्याहळून पहतांना अण्णांना जुन्या आठवणी जागृत झाल्याचे भासत होते.

सातारा जिल्ह्यातील कृषी औषध विक्रेत्यांचा अनिश्चित काळासाठी बंद !

रासायनिक खत उत्पादकांकडून दुकानदारांना होणारे लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय, त्यामुळे शासनाच्या आदेशाचे होणारे उल्लंघन, रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके यांचे नमुने अप्रमाणिक आल्यानंतर होणाऱी कारवाई यांसह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील कृषी औषध विक्रेत्यांनी अनिश्चित काळासाठी बंद चालू केला आहे

राज्यात गाजलेल्या ३०-३० घोटाळ्याची माहिती ‘ईडी’ने मागवली !

राज्यभरात गाजलेल्या ३०-३० घोटाळ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मागवली आहे. त्यातच आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणारी माहिती समोर आली आहे.

म्हापसा येथील ‘हिल टॉप रेस्टॉरंट’मध्ये भीषण स्फोट

रेस्टॉरंटमधील २ सिलिंडर सुस्थितीत असल्याने हा स्फोट घरगुती वापराच्या सिलिंडरच्या स्फोटाने झाल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. स्फोटाचे कारण अजूनही उलगडलेले नाही.

खानापूर (जिल्हा सांगली) येथील हुतात्मा नायब सुभेदार जयसिंह भगत अनंतात विलीन !

खानापूर येथील भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंह तथा बाबू शंकर भगत यांच्यावर २१ जानेवारीला खानापूर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सियाचीन येथील सीमेवर कर्तव्य बजावतांना हिमस्खलनात ते गंभीररित्या घायाळ झाले होते. उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली होती.  

श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री पंचमुखी गणेश मंदिराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम !

वर्ष १९९५ ला स्थापन केलेल्या पंचमुखी गणेश मंदिरास या वर्षी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे सोहळा काळात महाआरती, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, पारायण, भजन, श्रीगणेशाचा अभिषेक, जन्मकाळ आणि पालखी सोहळा, असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

घाटकोपर (मुंबई) येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्‍यात सहभागी १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची चेतावणी !

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील !