(म्हणे) ‘हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे श्री किंवा श्रीमती लावू शकत नाहीत !’-बांगलादेश सरकारचा फतवा !

याविषयी भारत सरकारने बांगलादेश सरकारकडे विचारणा केली पाहिजे आणि हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे

म्हादईवर गोवा शासन वर्ष १९९९ मध्ये ६१ धरणे बांधणार होते; मात्र अद्याप दोनच धरणे बांधून पूर्ण

गोवा राज्याला वर्ष २०५१ पर्यंत नागरिकांची पाण्याची आवश्यकता भागवण्यासाठी म्हादईवर ६१ धरणे उभारणे आवश्यक आहे; मात्र २ धरणे सोडल्यास अन्य सर्व ५९ धरणप्रकल्प हे आजतागायत कागदोपत्रीच आहेत.

पाकच्या कराची विमानतळावर गुंडांचे नियंत्रण !  

‘संपूर्ण पाक गुंड आणि जिहादी आतंकवादी चालवत आहेत’, असेच लक्षात येते !

कोट्यवधी रुपयांचे कर्ज असूनही कार्यक्रमांवर प्रचंड खर्च ! – विरोधकांचा सरकारवर आरोप

गोवा राज्यावर ६ सहस्र ४५० कोटी रुपयांचे कर्ज असूनही सरकार कार्यक्रम (‘इव्हेंट्स’) करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. या खर्चावरून सभागृह समिती नियुक्त करण्याची मागणी विरोधकांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी केली.

आता कर्नाटककडून कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी पर्यावरण अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी अर्ज

कळसा-भंडुरा धरण प्रकल्पाच्या ‘सविस्तर प्रकल्प अहवाला’ला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता कर्नाटकने या प्रकल्पाला पर्यावरण अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयांकडे अर्ज केला आहे.

सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्ला (सांखळी) येथे विश्वकल्याणार्थ ‘पौर्णमास इष्टी’ संपन्न !

सांखळी (गोवा) येथील सुर्ला येथे विश्वकल्याणार्थ ‘पौर्णमास इष्टी’ संपन्न झाली. सोमयाजी दीक्षित श्री. प्रकाश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जानेवारी या दिवशी वेदमूर्ती कै. कृष्णामामा केळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता.

युवक-युवतींनी आध्‍यात्मिक वारसा जोपासण्‍याची आवश्‍यकता ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

भ्रमणभाषच्‍या अतीउपयोगामुळे शहरासह ग्रामीण भागातही लव्‍ह जिहादसारखे प्रकार घडत आहेत. त्‍यामुळे युवती आणि माता-भगिनी असुरक्षित होऊ लागल्‍या आहेत. पालकांनी वेळीच सावध होऊन सामाजिक प्रसारमाध्‍यमांच्‍या आहारी गेलेल्‍या तरुणाईला वाचवायला हवे.

राज्‍य सरकारच्‍या अध्‍यादेशात हिंदी भाषेचा ‘राष्‍ट्रभाषा’ असा उल्लेख !

महाराष्‍ट्र राज्‍य हिंदी साहित्‍य अकादमीची फेररचना करण्‍यासाठी १६ जानेवारी या दिवशी शासनाचे उपसचिव विलास थोरात यांच्‍या डिजिटल स्‍वाक्षरीने लागू करण्‍यात आलेल्‍या अध्‍यादेशात ‘हिंदी ही राष्‍ट्रभाषा आहे’, असा उल्लेख करण्‍यात आला आहे.

कोरोनापेक्षा रस्‍ते अपघातात मृत्‍यू झालेल्‍यांची संख्‍या अधिक ! – राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्‍त

‘रस्‍ता सुरक्षा सप्‍ताहा’साठी २ सहस्र हेल्‍मेट देणार्‍या ‘रिलायन्‍स जिओ फाउंडेशन’चे प्रतिनिधी, तसेच अन्‍य प्रायोजकांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

पंजाबच्‍या गुरुदासपूरमध्‍ये पाकिस्‍तानी ड्रोनद्वारे शस्‍त्रपुरवठा !

असे प्रकार रोखण्‍यासाठी कुरापतखोर पाकला नष्‍ट करणेच आवश्‍यक आहे !