(म्हणे) ‘हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे श्री किंवा श्रीमती लावू शकत नाहीत !’-बांगलादेश सरकारचा फतवा !

प्रतिकात्मक चित्र

ढाका (बांगलादेश) – हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे ‘श्री’ किंवा ‘श्रीमती’ लावू शकत नाहीत, असा फतवा बांगलादेश सरकारने नुकताच काढला. तथापि मुसलमान विद्यार्थी मात्र त्यांच्या नावापुढे ‘महंमद’ लावू शकतात, असेही सरकारने स्पष्ट केले.

(मुसलमानबहुल देशांत अल्पसंख्यांसमवेत भेदभाव केला जातो, तर भारतासारख्या निधर्मी देशांत अल्पसंख्यांकांना डोक्यावर बसवले जाते ! – संपादक) ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून ही माहिती दिली. ‘बांगलादेश सरकारने बहुतेक पुस्तकांचे इस्लामीकरण केले आहे. सरकार हिंदूंवर इस्लाम लादत आहे’, अशी टीकाही या संघटनेने केली आहे.

संपादकीय भूमिका

याविषयी भारत सरकारने बांगलादेश सरकारकडे विचारणा केली पाहिजे आणि हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !