बार्शी येथे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोघांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले !

प्रतिकात्मक छायाचित्र

बार्शी (जिल्हा सोलापूर) – पांगरी पोलीस ठाण्यातील प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि चहा कॅन्टीन चालक या तिघांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. यामध्ये पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ खुणे, पोलीस शिपाई सुनील बोदनवाड आणि चहा कॅन्टीन चालक हसन सय्यद यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांवर जरब बसेल ! – संपादक)

तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या विरोधात गुन्हा नोंद आहे. न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन संमत केलेला आहे. या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्याच्या भावास जुजबी अटक करून जामिनावर सोडण्यासाठी गुन्ह्याचे अन्वेषण अधिकारी खुणे आणि शिपाई बोदनवाड यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी १५ सहस्र रुपयांची मागणी केली होती, तसेच लाचेची रक्कम हसन सय्यद याच्याकडे देण्यास सांगितले होते.

संपादकीय भूमिका 

लाचखोर पोलीस प्रशासन !