पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…

मूळ भारतातून नामशेष झालेली ‘ब्राह्मण’ ही देशी गायीची जात केवळ अमेरिकेत आहे. या गायींसाठी कोट्यवधी रुपयांचे मूल्य मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी देश त्या विकत घेत आहेत.

जगासाठी मोठी डोकेदुखी : चीनमधील अण्वस्त्रांची वाढती संख्या !

भारताकडे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता असली, तरी चीनकडे असलेल्या शस्त्रांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे केवळ भारतालाच नाही, तर सर्व जगालाच याचा धोका आहे.

आज, २४ डिसेंबर २०२२ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘मृत्युंजयदिन’ आहे. त्या निमित्ताने…

‘नेहरूंच्या नंतर देश रसातळाला जाईल’, असे समजणे शुद्ध खुळेपणा आहे. या देशाने एकापेक्षा एक असे श्रेष्ठ पुरुष निर्माण केले आहेत. नेहरूंनीच देशाची हानी केली आहे.’’

सैन्याच्या वाहनाला झालेल्या अपघातात १६ सैनिकांचा मृत्यू  

हे वाहन सकाळी चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे एका तीव्र वळणावर सैन्याच्या ३ वाहनांपैकी एक वाहन तीव्र उतारावरून घसरले आणि अपघात झाला.

रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

केंद्र सरकारचे संसदेत विधान ! ‘रामसेतू’ असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रहांद्वारे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर खरे रूप तेथे आहे, हे सांगणे अवघड आहे. तथापि असे काही संकेत आहेत, जे सूचित करतात की, अशा प्रकारची रचना तेथे अस्तित्वात असू शकते.

(म्हणे) ‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’

जर सिद्दीकी यांना खरेच असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या सर्वच धर्मबांधवांना विदेशात जाण्यास सांगावे ! किती देश तुम्हाला रहाण्यासाठी शरण देतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल !

भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना नियमावली घोषित

नव्या नियमावलीनुसार भारतात येणार्‍या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र समवेत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मुखपट्टी (मास्क) घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आमदार मुक्ता टिळक यांना विधानसभेत श्रद्धांजली !

मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे केवळ भाजपचीच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.

इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे आत्मघाती स्फोटात १ पोलीस ठार

येथील ‘आय १०/४ सेक्टर’मध्ये पोलिसांनी तपासणीसाठी थांबवलेल्या टॅक्सीमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये १ पोलीस ठार झाला, तर ४ पोलिसांसह ६ जण घायाळ झाले.

प्रवाशांनी तक्रारी केल्यास वाढीव शुल्क आकारणार्‍या ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई करू ! – शंभूराज देसाई, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन मंत्री

प्रवाशांकडून संबंधित ट्रॅव्हल्स चालकांविरोधाच्या तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.