सैन्याच्या वाहनाला झालेल्या अपघातात १६ सैनिकांचा मृत्यू  

गंगटोक (सिक्कीम) – सिक्कीमच्या झेमा येथे भारतीय सैन्याच्या वाहनाला अपघात होऊन यात १६ सैनिक मृत्यूमुखी पडले. हे वाहन सकाळी चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे एका तीव्र वळणावर सैन्याच्या ३ वाहनांपैकी एक वाहन तीव्र उतारावरून घसरले आणि अपघात झाला.

या अपघातात ४ सैनिक घायाळ झाले. घायाळ सैनिकांना उपचारांसाठी विमानाने रुग्णालयात नेण्यात आले.