दौंड (जिल्हा पुणे) येथील धर्मांतर प्रकरणातील ३ धर्मांधांची येरवडा कारागृहात रवानगी !

प्रतिकात्मक छायाचित्र

दौंड (जिल्हा पुणे) – येथील भीमा नदीकाठी वीटभट्टीत मजुरी करणार्‍या बबलू चव्हाण या तरुणाने मुसलमान समाजातील विधवा महिलेसमवेत लग्न केल्याने त्यांच्या पत्नीला कुमेल कुरेशी, आसिफ शेख आणि अन्य काही साथीदार यांनी घटस्फोट घेण्यासाठी दबाब टाकला होता. पत्नीने नकार दिल्यानंतर बबलू चव्हाण यांना मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दमदाटी करण्यात आली; परंतु या गोष्टीला नकार दिल्याने बबलू यांची आझम शेख याने बळजबरीने सुंता केली. त्यामुळे विवाहित हिंदु तरुणाचे बळजोरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या ३ संशयितांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले होते.