रत्नागिरीत भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यातील १८ सहस्र रुपयांची चोरी

रत्नागिरी – भर दिवसा शहरातील टिळक आळीतील दुकानाच्या गल्ल्यामधून अज्ञाताने १८ सहस्र रुपये चोरी केले आहेत. २८ डिसेंबरच्या दुपारी २.४५ ते ३.२० या कालावधीत घडली.

याविषयी गणेश रानडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीनुसार टिळक आळीतील ‘विक्रम प्रसाद आर्केड’मध्ये श्रीरंग एंटरप्रायझेस नावाचे जनरल स्टोअर्स आहे. २८ डिसेंबरला दुपारी पांढर्‍या रंगाचा शर्ट आणि फुल पँट घातलेला १ तरुण दुकानात शिरला होता. त्याने कुणाचेही लक्ष नाही, असे पाहून दुकानाच्या गल्ल्यामधून १८ सहस्र रुपये चोरून नेले आहेत. काही वेळाने ही गोष्ट गणेश रानडे यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानाबाहेर आणि दुकानाच्या आजूबाजूला त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सापडला नाही. शेवटी रानडे यांनी पोलीस ठाण्यात  तक्रार केली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

असुरक्षित जनता !