मूळचे डोंबिवली येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले श्री. प्रकाश राऊत यांनी त्यांच्या पत्नीच्या आजारपणात अन् तिच्या निधनानंतर अनुभवलेली गुरुकृपा !

माझी पत्नी आणि दोन्ही मुले यांना कोरोनाचा संसर्ग झाला. आरंभी ‘ते औषधे आणि पथ्य पाळून बरे होतील’, असे मला वाटले होते; पण अकस्मात् ३१.३.२०२१ या दिवशी पत्नीतील प्राणवायूची पातळी न्यून झाली आणि तिला रुग्णालयात भरती करण्यात आले.

साधिका कोरोनाबाधीत असतांना तिने गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) मानस बोलणे, त्या वेळी तिला गुरुदेवांचे शिवरूप दिसून ‘ते साधकांचे रक्षण करणार आहेत’, असे सांगत असल्याचे जाणवणे

‘जेव्हा जेव्हा माझ्या साधकांवर संकट येईल, तेव्हा त्यांच्यावर आलेले संकट मी तिसरे नेत्र उघडून नाहीसे करणार आहे.’ तेव्हापासून आपत्काळाची आठवण झाली, तरी मला शिवरूपातील गुरुदेवांचे रूप आठवते.’