घरामध्ये स्वसंरक्षणासाठी भाजी कापण्याचा तरी चाकू ठेवा ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

खासदार साध्वी प्रज्ञासिंह

शिवमोग्गा (कर्नाटक) – ‘लव्ह जिहाद’ ही जिहादी परंपरा आहे. काहीच करता येत नाही, तर ते (मुसलमान) लव्ह जिहाद करतात. ते प्रेमामध्येही जिहाद करतात, असे विधान भोपाळ येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिंदु जागरण वेदिकेच्या कार्यक्रमात केले. ‘आपल्या मुलींना वाचवा. त्यांच्यावर योग्य संस्कार करा’, असे आवाहनही त्यांनी या वेळी हिंदूंना केले.

शिवमोग्गा येथील एका हिंदु कार्यकर्त्याच्या हत्येच्या संदर्भात साध्वी प्रज्ञासिंह पुढे म्हणाल्या की, हिंदूंनी घरात शस्त्र ठेवले पाहिजे. किमान भाजी कापण्याचा चाकू धार काढून ठेवला पाहिजे. कधी त्याचा स्वसंरक्षणासाठी वापर करावा लागेल, हे सांगता येणार नाही. सर्वांनाच स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. जर कुणी तुमच्या घरात घुसला, तुमच्यावर आक्रमण करत असेल, तर त्याला उत्तर देण्याचा आपल्याला अधिकार आहे.