‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन कायदा करणार ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, २६ डिसेंबर (वार्ता.) – ‘मी मंत्री असलो, तरी प्रथम मी हिंदु आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित रहाणे, हे माझे आद्य कर्तव्य आहे’, असे मी मानतो. ‘लव्ह जिहाद’चा रोग संपूर्ण देशामध्ये पसरत असून तो रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन कायदा बनवण्याच्या सिद्धतेत आहे. १०० टक्के हा कायदा होणार आहे, असे आश्‍वासन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. २५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदान येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ते उपस्थित होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हे आश्‍वासन दिले.