विधान परिषदेतून…
केंद्र सरकारकडे ठराव पाठवण्यात येणार !
मुंबई, २६ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास २६ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत संमती देण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याविषयी शासकीय ठराव मांडला होता. ‘बॅ. नाथ पै’ यांचे जीवनचरित्र पुढील पिढीला कळावे, यासाठी विमानतळ परिसरात विस्तृत माहितीचे शिलालेख, तसेच त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरवण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
#सिंधुदुर्ग येथील विमानतळाला “बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग” असे नाव देण्याच्या ठरावाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी @DDNewslive @DDNewsHindi #WinterSession #MAHARASHTRA pic.twitter.com/ciN9sslhNX
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 26, 2022
या विमानतळास वायुयान नियमानुसार सिंधुदुर्ग विमानतळ, सिंधुदुर्ग यासाठी ‘आय.आर्.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ला विमानतळ सार्वजनिक हितासाठी वापरण्यासाठी परवाना देण्यात आला होता. सिंधुदुर्ग विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ करण्याविषयीची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. या ठरावाच्या वेळी विधान परिषदेचे सदस्य जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही सूचना मांडली होती.