संभाजीनगर येथील श्री स्मशान हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

श्री स्मशान हनुमान मंदिर

संभाजीनगर – येथील श्री स्मशान हनुमान मंदिर संस्थान, संजयनगर येथे १७ ते २४ डिसेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या वेळी ह.भ.प. उद्धव महाराज टाकसाळ, ह.भ.प. सुधाकर महाराज वाघ, ह.भ.प. भानुदास महाराज आदी नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून २३ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची शोभायात्रा दिंडी काढण्यात येणार आहे, तसेच प्रतिदिन विष्णु सहस्रनाम, हनुमंताची आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, भावार्थ रामायण, सामूहिक हरिपाठ, हरिकीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.