७० तुकडे करता येतील इतका आफताब नालायक ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते अजित पवार

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – कोंबडीचे १० तुकडे करायचे असतील, तर १० वेळा विचार करावा लागतो. येथे एका मुलीचे ३५ तुकडे केले. कायद्यात तरतूद असती, तर याचे ३५ तुकडे करता आले असते. ७० तुकडे करता येतील, इतका हा नालायक आहे, असा तीव्र संताप श्रद्धा वालकर हिची क्रूर हत्या करणार्‍या आफताब पूनावाला याच्याविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला. आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर अजित पवार यांनी वरील भावना व्यक्त केली.